सुदर्शन कला व संगीत शिबिराचा सांगता समारोप व कलादालनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

       नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) संचलित स्वछंद संगीत महाविद्यालय प्रस्तुत सुदर्शन कला व संगीत शिबिराचा सांगता समारोप दि.१ मे २०१५ रोजी संपन्न झाला.
       या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्री. संतोष पाटील (तज्ञ मार्गदर्शक, समुपदेशक व प्रसिद्ध चित्रकार), कु. काजल पाटील (प्रसिद्ध चित्रकार, व्यवस्थापिका के. पी. ड्रॉइंग क्लासेस), संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
       सर्व उपस्थितीत मान्यवरांनी मागील 10 दिवसापासून मुलांनी तयार केलेल्या कलाकृतीच्या दालनाचे उद्घाटन करून मुलांच्या कला गुणांचे कौतुक केले. 
        तसेच या कलादालनास विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. यावेळी माध्यमिक विभाग उपशिक्षणाधिकारी श्री. विशाल दशवंत साहेब, श्री. गणेश भांबूरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रंगराव आठवले, तसेच कुपवाड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी संघटना व पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेले कॅनव्हास पेंटिंग, पाऊच पेंटिंग, पॉट पेंटिंग, वारली चित्रकला, कागदी काम याचे कौतुक केले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी सुरपेटी, तबला व कराओके सिंगिंग यांची प्रात्यक्षिके सादर केली.
        या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, संचालिका कांचन उपाध्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व विभागांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर - कर्मचारी, पालक, विद्यार्थी - विद्यार्थिनींनी उपस्थित होते.
      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनीता चौगुले व आभार शिवकन्या जमदाडे यांनी केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी