अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडचे 10 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश

अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडचे 10 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश

इ.10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल 100.00%



                                            प्रथम क्रमांक  - चि. नील दिपक पाडळे (91.40 %)

                          द्वितीय क्रमांक -  कु. तन्वी दिपक जगताप (91.20 %)    

                     तृतीय क्रमांक  - कु. स्नेहल रामचंद्र कोळेकर (88.60 %)

          अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड या शाळेचे इ. 10 वी चे दुसरे वर्ष असून सलग दुस-या वर्षी 100 टक्के निकालाची परपरां शाळेने कायम राखली आहे. परीक्षेस एकूण 17 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले त्यापैकी उच्च श्रेणीमध्ये - 10, प्रथम श्रेणी - 3, द्वितीय श्रेणीत - 4  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी –

1)   चि. नील दिपक पाडळे – 91.40 %

2)   कु. तन्वी दिपक जगताप – 91.20 %

3)   कु. स्नेहल रामचंद्र कोळेकर – 88.60 %

              या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन  या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, संस्थेच्या संचालिका व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम, संचालिका पुनम उपाध्ये मॅडम, संचालक अभिजीत शेटे सर यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक - शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कुपवाड व परिसरातून कौतूक होत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड यांचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अकुज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वछंद संगीत सभागृहाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न