उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ. 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के

अर्पिता रणजीत गौंड. (85.67%) प्रथम क्रमांक
कु. अनुष्का शंकर सावंत.(80.17%) व्दितीय क्रमांक
कु पायल संजय माळी (78.17%) तृतीय क्रमांक

         नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली) संचलित, सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विदयालय, कुपवाडचा इ.12 वी बोर्ड परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला.  कु. अर्पिता रणजीत गौंड (85.67%) प्रथम क्रमांक, कु. अनुष्का शंकर सावंत (80.17%) व्दितीय क्रमांक, कु पायल संजय माळी (78.17%) हिने तृतीय क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाली. शाळेच्या उच्च श्रेणीत - 05, प्रथम श्रेणीत 15 व  द्वितीय श्रेणीत 14 विद्यार्थींनी उत्तीर्ण होत उत्तुंग यश संपादित केले. या सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे कुपवाड व परिसरातून कौतुक होत आहे.
      या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम, संचालिका पुनम उपाध्ये मॅडम, सचिव रितेश शेठ सर यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक - शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी