इ.8 वी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे यश
इ.8 वी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2024-25 नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित, सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड प्रशालेतील विद्यार्थीनींनी केंद्रस्तरीय आयोजित NMMS (National merit cum scholarship) या परीक्षेमध्ये एकूण 25 विद्यार्थीनींनी उत्तुंग यश संपादन केले आहे..
केंद्रस्तरीय NMMS शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी ( प्रति वर्ष 12000 रु शिष्यवृत्ती)
1) कु.सानिका भिमराव डोंबाळे
2) कु.सृष्टी सिद्धनाथ कांबळे
NMMS (सारथी) शिष्यवृत्ती (प्रति वर्ष 9600 रुपये) प्राप्त विद्यार्थिनी -
1. कु.आरुषी दादासो बेडगे.
2.कु.राधिका दशरथ बेडरे.
3.कु.वैष्णवी बाळू चव्हाण.
4.कु.संस्कृती श्रीकांत शिंदे.
5.कु.श्रेया मोहन शिंदे.
6.कु.विजया महेश घाडगे.
7.कु.रिया नायकु पवार.
8.कु.पूजा शिवाजी पाटील.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थीनींना आपल्या नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मार्गदर्शक श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सूरज उपाध्ये सर,सचिव श्री.रितेश शेठ सर, संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम व सर्व संचालक ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शिरीष चिरमे सर, पर्यवेक्षक श्री.अनिल चौगुले सर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थीनींना स्पर्धा परीक्षा प्रमुख सौ.निर्मला वाडकर मॅडम , श्री. दिलीप माळी सर, श्री.अनिल चौगुले सर,सौ.स्वप्नाली पाटील मॅडम,श्री.आशुतोष भोसले सर यांचे मार्गदर्शन मिळाले.तसेच विद्यार्थिनींचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी प्रशालेचे वरिष्ठ लिपीक श्री.स्नेहल लाड सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थिनी व त्यांचा पालक वर्ग यांचे शाळा व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन