नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड मध्ये चित्रकला व रांगोळी प्रदर्शन

            
        नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्यामार्फत रिफ्रेश योर माईंड या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींच्या शारीरिक, भावनिक, मानसिक व वैचारिक क्षमतांना प्रब्लता निर्माण करण्यासाठी व आत्मविश्वास वाढवून बळ देण्यासाठी रिफ्रेश योर माईंड या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे मनोबल वाढविले जात आहे.  
         संस्थेचे सचिव मा.रितेश शेठ सर यांच्या कल्पनेतून इ.8 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनींना दर शनिवारी स.11.30 ते 12.30 या वेळेत मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थिनींमध्ये सक्षम आव्हानांना सामोरं जाणारे व्यक्तिमत्व घडवत आहोत म्हणूनच 26 जानेवारी 2025 रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रिफ्रेश युवर माईंड  या विषयावर रांगोळी, चित्रकला व पोस्टर प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात आल्या. 
         कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक व व्याख्याते मा.भिमराव धुळूबुळू व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष मा.सूरज उपाध्ये सर व संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम यांचे हस्ते करण्यात आले.
          इ.1 ली ते 12 वी मधील सर्व विद्यार्थ्यांनीना याचा लाभ घेतला. या प्रदर्शनासाठी वसंतलाल एम. शाह फर्म चे डायरेक्टर  सन्मानीय श्री. राजेश भाई शहा व सौ. भाविकाबेन शहा या विशेष अतिथींच्याकडून सहभागी विद्यार्थिनींना  शालोपयोगी साहित्याचे  वितरण करण्यात आले  त्याच बरोबर  संस्थेचे सचिव मा. श्री रितेश सेठ सर यांच्याकडून चित्रकला स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धा यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना व रांगोळी स्पर्धेतील  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी यांना शालोपयोगी  वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींना मुख्याध्यापक मा. चिरमे सर यांचे प्रोत्साहन व सौ.सुनीता चौगुले मॅडम व कलाशिक्षक मा.हेमंत मोहिते सर यांचे मार्गदर्शन लाभले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी