नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेला राज्य अल्पसंख्याक कमिटीची भेट

Admin
         
           राज्यातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त धार्मिक शैक्षणिक संस्था शाळा तपासणी अंतर्गत, नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड या संस्थेस भेट दिली.सौ.आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड या शाळांमध्ये विविध शासकीय योजना कशा प्रकारे राबविल्या जातात याची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
           पुणे शिक्षण संचालक विभाग पुण्याचे योजना अधिकारी सचिन अनंतकवळस, माने साहेब, योजना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे साहेब, उपशिक्षणाधिकारी गिरी साहेब व बाहुबली रई सर यांनी शासनाने दिलेले सर्व निकष शाळा पूर्ण करते का ते पाहून समाधान व्यक्त केले.
           यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, प्रायमरीचे मुख्याध्यापक कुंदन जमदाडे, माध्यमिकचे पर्यवेक्षक अनिल चौगले यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करणेत आला.