नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड यांच्या संयुक्त सर्व विभागांच्या शाळांची आंतर शालेय स्पर्धेचा तिसरा दिवस उदघाट्न दि. 20 डिसेंबर रोजी मिरज तालुका क्रिडाधिकारी मा. आरती हळींगळे. तसेच नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, सर.यांचे हस्ते ध्वजारोहन व दिप प्रज्वलन पूजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी पाहुण्यांचे सत्कार, खेळाडूंचे स्वागत, फूड स्टॉल, MCF प्रशिक्षणार्थी मानवदंना, मल्लखांब प्रात्यक्षिके इ.
उपक्रमानी झाला.तसेच दि.19 डिसेंबर रोजी. झालेल्या शालेय स्पर्धांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ घेण्यात आला. प्रमुख पाहुण्या सौ.हळींगळे मॅडम नी आपल्या मार्गदर्शक भाषणामध्ये विध्यार्थ्यांना खेळाचे महत्व, खेळामध्ये सातत्य ठेवल्यास आपल्या जीवनात धन, प्रतिष्ठा व आपली स्वप्न पूर्ती कशी मिळते. याबद्दल आपले मनोगत सांगितले. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ,संचालिका कांचन उपाध्ये, सर्व विभागांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तर सुत्रसंचालन सौ.आरते मॅडम, सौ.माने मॅडम व श्री.आशुतोष भोसले सर यांनी मानले.