सोलापूर येथे पार पडलेल्या सोहळ्यात अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड सांगली संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल कुपवाड ता. मिरज जि. सांगली या शाळेच्या कार्याची दखल घेवून स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव करणेत आला.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा. सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र माने, मा. सचिन जगताप शिक्षणाधिकारी (माध्य.), मा. कादरजी शेख शिक्षणाधिकारी (प्राथ.), सोलापुर यांच्या हस्ते अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेस राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करणेत आला. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नाडिंस व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष (अण्णा) काळजे, संयोजक बापूसाहेब अडसूळ , प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी व्हनकडे, अनिलकुमार धायगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या शाळेच्या यशामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, संचालक अभिजित शेटे, शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे सर्व स्तरास्तर कौतुक होत आहे.