रोझिना फर्नांडिस यांना रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांचा आदर्श शिक्षिका नेशन बिल्डर ॲवार्ड - 2024

Admin

 



        शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंचा सन्मान रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांचे मार्फत  करणेत आला एक आदर्श शिक्षिका कशी आसावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोझिना फर्नांडिस. त्या मागील 33 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत विविध शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका व शिक्षिका म्हणून काम पाहिले. 

        सद्या त्या कुपवाड येथील अकुज् इंग्लिश मिडियम स्कूलच्या उपमुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शाळेमध्ये त्यांनी डिजीट्ल शिक्षण प्रणाली, जीवन कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, इंडस्ट्रीयल भेटी, स्कॉलरशिप, नासो व ऑलिम्पियाड परीक्षा, शिक्षक प्रशिक्ष्ण हे शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रम राबवून विद्यार्थी व शिक्षक यांच्या सर्वागिंण विकासासाठी त्या प्रयत्नशील आहेत.  

        या सर्व कार्याची दखल घेवून त्यांना रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांचे मार्फत आदर्श शिक्षिका नेशन बिल्डर ॲवार्ड – 2024  पुरस्काराने सन्मानित करणेत आले. यावेळी  प्रा. नारायण मराठे, अध्यक्ष  किशोर लुल्ला, सचिव  स्वप्निल पाटील, उदय कुलकर्णी,  राहुल पाटील, अनंत कोकणे, अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये, बेनिग्नो फर्नांडिस उपस्थित होते. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतूक होत आहे.