न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Admin


      


           नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड (सांगली) संचलित, न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड या शाळेच्या सोहम सुनील कोष्टी - गुण- 242 जिल्हा 29 वा,   मंथन दादासाहेब ठोंबरे -गुण -234  जिल्हा- 44 वा,  रितेश राजेंद्र पुजारी - गुण - 214  याविद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.  "कष्ट करणाऱ्यांच्या एकजुटीला अशक्यप्राय असं काहीच नाही." 

            सदर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री. अमोल राठोड सर ,सौ. हेमलता धोतरे मॅडम, सौ. आसावरी आरते मॅडम यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे सर, शाळेचे पर्यवेक्षक श्री .अनिल शिंदे सर, संस्थेचे अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष मा .सूरज उपाध्ये सर,सेक्रेटरी मा. रितेश सर, संचालिका सौ. कांचन उपाध्ये मॅडम, डॉ.पूनम उपाध्ये मॅडम यांनी सदर विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कुपवाड व परिसरातून कौतूक होत आहे.