नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

Admin
      
     
     आज शुक्रवार, दि.२१ जुन २०२४ अकुज् शैक्षणिक संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व संगीत दिन उत्साहात साजरा झाला. अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट व नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित सर्व विभागांचा संयुक्त संगीत, योगदिन संस्थेच्या अकुज् क्रीडांगणावर संस्थेचे अध्यक्ष नीuमा.आण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
      योगतज्ञ श्री.मोहन जगताप यांनी योगाचे व प्राणायामाचे महत्त्व प्रात्यक्षिके घेऊन पटवून दिले. हास्यकल्लोळच्या जया जोशी मॅडम यांनी हास्याचे आयुष्यातील फायदे सांगत हास्य योगाची प्रात्यक्षिके घेतली. तसेच बिट टु फिट च्या प्रियांका शेजाळ मॅडम यांनी झुंबा व अरेबिक्स यांच्या माध्यमातून शारीरिक कसरतीचे धडे शिकवले. संगीत दिनाच्या औचित्य साधून  संगीत विभागाचे प्रमुख विक्रम कदम यांनी विविध गाण्यांच्या थीम ऐकवून मुलींना गाणी म्हणण्यास प्रोत्साहित केले. 
       सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी योगासन हास्ययोग ,झुंबा व संगीताच्या प्रात्यक्षिकांचा सर्व शिक्षकांच्या समवेत आनंद अनुभवला. या योग दिनासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, संचालिका कांचन उपाध्ये मॅडम, सचिव रितेश शेठ सर, संचालिका पुनम उपाध्ये मॅडम व सर्व संचालक सर्व विभागाचे मुख्याध्यापक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा शिक्षक श्री.एस. एम. कांबळे सर यांनी सर्व शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले तर याचे निवेदन श्री पाटील एस. एस. यांनी केले.