सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Admin

 


सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड  येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५  या नविन शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस इयत्ता ५ वी ते ८ वी. या वर्गामधील  नविन प्रवेश  नवोगतांचे स्वागत कार्यक्रम प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, शाळेचे मुख्याध्यापक  शिरीष चिरमे सर,पर्यवेक्षक अनिल चौगुले. सर, सर्व शिक्षक – शिक्षकेतर  कर्मचारी व विद्यार्थिनी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

  शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरूवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  सरस्वती पूजनाने  करण्यात आली. श्री.चिरमे सरांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व नवीन विद्यार्थिनींचे स्वागत व शाळे संदर्भात माहिती सांगितली.  दि. ५ जुन जागतिक पर्यावरण दिना निमित्त घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सर्व  नवीन विद्यार्थिनिंना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली. 

        शाळेच्या इ.१० वी व १२ वी उत्कृष्ठ  निकालाबद्दल अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मा.आण्णासाहेब उपाध्ये सरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सर्व विद्यार्थिनिंना शाळेतील विविध शासकीय परीक्षा व त्याबद्दल दिले जाणारे योग्य मार्गदर्शन माहिती सांगून सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. इयत्ता ५  वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या पहिल्या दिवशी आगमन केलेबद्दल जिलेबी वाटप करुन त्याचे स्वागत करणेत आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन व आभार सुशांत पाटील सर यांनी केले.