सौ. आशालता उपाध्ये यांचा रोटरी तर्फे आदर्श माता पुरस्काराने सन्मान

Admin

         

        एक आदर्श माता कशी आसावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे आशालता उपाध्ये. त्यांनी त्यांच्या दिव्यांग मुलीला डॉक्टर व मुलांना इंजिनिअर करून त्यांना स्वबळावर उभे केले.  घराला घरपण आणि सामाजिक स्थान आणि परिवार समृद्ध बनविण्यात त्याची  मोलाची साथ आहे. या सर्व कार्याची दखल घेवून त्यांना रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व बियानी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सौ. गोदावरीदेवी बियाणी यांच्या स्मरणार्थ मागील 26 वर्षापासून आदर्श माता कृतज्ञता पुरस्कार आयोजित केला जातो. यावर्षी 2023 चा पुरस्कार  सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये यांना राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी याच्या हस्ते प्रदान करणेत आला.  त्याचे स्वरूप साडी, सन्मानचिन्ह, नारळ असे होते. 

         कार्यक्रमाचे संयोजक सुशील बियाणी यांनी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवराचे व पुरस्कार्थींचे स्वागत केले. विलास सुतार यांनी प्रास्ताविक केले. किशोर लंबे यांनी पुरस्कारप्राप्त मातांचा परीचय करून दिला. यावेली जी.एस. टी. चे केंद्रीय निरीक्षक राजेंद्र मेढेकर, शिवनाथ दगडे, डॉ. चंद्रशेखर पुरंदरे, डॉ. सुधीर गवळी, डॉ. उज्वला गवळी , आण्णासाहेब उपाध्ये, सूरज उपाध्ये, कांचन उपाध्ये, पूनम उपाध्ये, बादल उपाध्ये व कोमल उपाध्ये यांचेसह नातेवाईक व मित्रपरीवार उपस्थित होते. त्यांचे सर्व स्तरातर अभिनंदन होत आहे.