सौ.आ.आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचे NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश





      कुपवाड येथील सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा व इ. 8 वी NMMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत संस्थेचा व शाळेचा नावलौकिक वाढविला.
          इ. 8 वी मधील NMMS परीक्षेत 36 मुलींपैकी 33 मुली उत्तीर्ण झाल्या त्यापैकी 3 मुलींना वार्षिक रू.12 हजार प्रमाणे चार वर्षाची रू. 48 हजार शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थिनीची नावे कु. तृप्ती हणमंतराव सायमोते, कु. सृष्टी सदाशिव मेलशंकरे, कु.श्रेया वाघमोडे
त्याच बरोबर इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. अक्षरा पाटील हीने रू. 15 हजार दोन वर्षाची शिष्यवृत्ती प्राप्त केली. तर सारथी शिष्यवृत्ती रू. 9600 प्राप्त विदयार्थिनिंची नावे कु.ज्ञानेश्वरी चव्हाण, कु.विजया चव्हाण, कु. समिक्षा मोहिते, कु. श्रावणी शेटे, कु. अनुष्का पाटील, कु. प्रीती शिंदे इ.
         या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनींचे व प्रशिक्षक शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सौ. आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय,कुपवाड मध्ये नवीन प्रवेश नवोगत विद्यार्थिनींचे स्वागत खाऊ व पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग व संगीत दिवस उत्साहात संपन्न

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी