अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये यश

Admin

          


    

           दि. 14 एप्रिल 2024 रोजी गोवा येथे पार पडलेल्या स्कील डो या मार्शल आर्ट खेळप्रकारामध्ये अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल,कुपवाड या शाळेचा इ. 4 थी मधील विद्यार्थी चि. अजहर अब्दुलरौफ शेख याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्कील डो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व कास्य पदक पटकाविले व यश संपादन केले.  त्यांचा संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर यांचे हस्ते सत्कार करणेत आला. त्यास संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये मॅडम, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नाडींस मॅडम, क्रीडा शिक्षक प्रशांत आढळी सर, वडिल अब्दुलरौफ शेख व आई आयेशा शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे कुपवाड व परिसरातून अभिनंदन व कौतूक होत आहे.

             त्याच्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतल्यास त्याच्याकडे तब्बल 25 विविध खेळप्रकारातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण, रौप्य व कास्य पदके आहेत.