अकुज् स्पोर्ट्स क्लब कुपवाड मार्फत दि. 20 एप्रिल ते 29 एप्रिल अखेर स्वयंशिस्त व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

Admin

    

        अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट,कुपवाड (सांगली), नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड व अकुज् स्पोर्ट्स क्लब, कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने  दि. 20 एप्रिल 2024 ते 29 एप्रिल 2024 अखेर इ. 1 ली ते 10 वी  मुलां- मुलींकरीता स्वयंशिस्त व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन अकुज् इंग्लिश मिडियम स्कूल क्रीडागंण, अकुज् ड्रिमलॅण्ड, मेन रोड कुपवाड येथे आयोजित केले आहे. 

        या शिबीराचे वैशिष्ठ म्हणजे कला, क्रीडा याबरोबरच तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांची प्रेरणादायी व्याख्याने, कंमाडो ट्रेनिंग, रायफल शुटींग, आर्चरी, हॉर्स रायडिंग, स्विमिंग, तलवार बाजी, दांडपट्टा, लाठी काठी, योगा, ऍरोबिक्स,तायक्वांदो, ज्युदो, बॉक्सिंग, चेस, कॅरम, हॉलिबॉल, झुंबा डान्स, ट्रेंकिंग व वॉटर पार्क एक दिवसीय सहल इ. क्रीडाप्रकार  या शिबीरामध्ये घेणेत येणार आहेत.

        आपल्या शिबिराची सुरुवात 20 एप्रिल पासून होत आहे. त्यामुळे शिबिरात सहभागी होऊन आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी, धाडसी वृत्ती वाढविण्यासाठी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. 

          नाव नोंदणीसाठी व अधिकमाहितीसाठी  खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.  
         प्रशिक्षक प्रशांत आढळी सर -  8668968039