नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड यांचे वतीने 79 वा स्वातंत्र्यदिन संपन्न.
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संस्थेच्या सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हाय व उच्च, माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, अकुज प्रायमरी स्कूल, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, लाल बहादुर बालमंदीर कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन प्रसिध्द उद्योजक विजय सवदी, जय रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. मिरज, उद्योजिका अर्चना पवार, मास इंजिनिअरींग प्रा. लि. सांगली, स्वप्नाली माने, कक्ष अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जि. प. सांगली यांचे हस्ते ध्वजारोहणाने व भारत माता प्रतिमेच्या पूजनाने संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तद्ननंतर संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी कवायत, संचलन, मानवंदना, मार्च पास, रायफल डेमो, देशभक्तीपर गीते व नृत्य, ढोलताशे पथक, विद्यार्थी मनोगते, या प्रात्यक्षिकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ...